Friday, July 20, 2007

शुभ्र चांदण्याची ही सुगंधीत रात्र आहे
त्या देखण्या चंद्रकोरीची उणीव मात्र आहे

जाणतो मी आता आली आहेस इथेच तू
ही वेल रातराणीची निमित्त मात्र आहे


डाग म्हणुनी याला हिणवू दे कुणालाही
तो तीळ गालावरचा प्रेमास पात्र आहे

गाऊ तुझ्याविना सांग कसा 'यमन' मी
त्या तीव्र मध्यमेची ऊणीव मात्र आहे.



Datta

2 comments:

HAREKRISHNAJI said...

वा

Girish Mukim said...

तुमच्या सारख्या प्रतिभावंत कविंसाठीच खालील वेबसाईट आहे
www.kavyazalegane.com
शब्दांच सौंदर्य आणखिनच खुलेल :-)
नक्कीच आवडेल.एकदा वेबसाईटवर येउन तर पहा.